मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं आहे. मागील दोन आठवड्यांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचे आढळून आले आहे.
४० वर्ष भाजपात होतो तेव्हा एकनाथ खडसे चांगला, अन् आता लगेचच वाईट? खडसेंचा भाजपला सवाल
यावर आता महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच दिली होती. मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या कोव्हिड सेंटरची कंत्राटे ही शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आली आहेत असा आरोप भाजपने केला होता. या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे असं देखील भाजपने म्हटलं होतं.
शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला
भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांवर आज ‘सामना’तून खरमरीत शब्दांत टीका करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे चांगले काम करत आहेत. मात्र मुंबईमधील काही भारतीय जनता पक्षाच्या नाच्यांकडून करोनाच्या या लढाईत टीका करण्याचे काम सुरु आहे असा घणाघात शिवसेनेकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या उपाययोजनांत भ्रष्टाचार सुरु आहेत, घोटाळे सुरु आहेत, असे आरोप महाराष्ट्रातून कोणी केले नाहीत आणि करणाराही नाहीत.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे
मुंबई आणि महाराष्ट्रात जे कार्य करोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा. तेवढेच पुण्य पदरी पडेल, पण जे चांगले सुरू आहे. त्यावर चिखलफेक करायची, यापेक्षा वेगळे उद्योग त्यांचे दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हे चांगले काम करत असताना भाजपच्या नाच्यांनी त्यांना अपशकून करु नये, अशी टीका अग्रलेखातून संजय राऊत यांनी केली आहे.
Read also:
- पवारसाहेबांनी मनात आणले तर खेडमध्ये विमानतळ होऊ शकते; आमदार दिलीप मोहिते पाटलांचा दावा
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
- पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ