जळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलेच वाकयुद्ध रंगले आहेत. जळगावात दोन्ही खडसे-महाजन हे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. एकनाथ खडसे यांना कोरोना झालेला असताना गिरीश महाजन यांनी ईडी अटक करणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप केला होता.
देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
खडसेंनी देखील आता महाजनांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करत मागील गोष्टींचे उट्टे काढले आहेत. थेट बुधवारपेठेत महाजनांना जाण्याचा सल्ला खडसेंनी दिला आहे. त्यानंतर पुन्हा गिरीश महाजनांनी त्यांना उत्तर दिले.
देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
आता एका कार्यक्रमात खडसेंनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. ईडीच्या कारवाईवरून खडसेंनी भाजपावर टीका केली आहे. मी गेली ४० वर्ष तुमच्यासोबत होतो तर चांगला होतो आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर एका वर्षात ईडी मागे लावली, असं म्हणत त्यांनी भाजपाला सुनावलं. ते जळगावातील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
भाजपला तळागाळात वाढवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. गावोगावी जाऊन पक्षाची धोरणे जनतेला समजून सांगितली. अनेक लोक घडवले. पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. कोणी पंचायत समिती सदस्य झाला. कोणी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , जिल्हा परिषद अध्यक्ष देखील माझ्या नेतृत्वाखाली झाले.
भाजप नेते गिरीष महाजन अडचणीत; पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी
४० वर्ष रक्ताचं पाणी करत भाजप वाढविण्यासाठी मी फिरत होतो. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावोगावी पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली,” अशी आठवण एकनाथ खडसेंनी मेळाव्यात बोलताना सांगितली. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच एका वर्षात माझ्या मागे ईडीचा समेरीमा लावला. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही पक्ष वाढवला आज त्याचा अपमान करता. त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील, जनता तुम्हाला येणाऱ्या काळात माफ करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
Read also:
- आता आमचं नवीन ठरलंय; जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीआधीच खासदार मंडलिकांनी उडवली खळबळ
- आम्हाला महाविकास आघाडीमध्ये कोणीच विचारत नाही; आमदार शहाजी पाटलांचा शिवसेनेला घरचा आहेर
- बुधवारपेठेच्या वक्तव्यावरून गिरीष महाजनांनी खडसेंना सुनावलं; म्हणाले, त्यांचं डोकं फिरलं…
- गिरीष महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल – एकनाथ खडसे
- …म्हणून महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना आवडतो; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप