जळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलेच वाकयुद्ध रंगले आहेत. जळगावात दोन्ही खडसे-महाजन हे एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. एकनाथ खडसे यांना कोरोना झालेला असताना गिरीश महाजन यांनी ईडी अटक करणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप केला होता.
गोवा आणि युपीमध्ये शिवसेना रणशिंग फुंकणार? संजय राऊतांनी निवडणुकीच गणित सांगितलं
गिरीश महाजन यांनी कोरोना झाल्यानंतर जाहीर करताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढत पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महाजन याना कोरोना झाला ,असा टोला लगावला. त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली. त्यावर खडसे यांनी ”गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला लगावला. त्याला महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाजन यांनी म्हटलं आहे की एकनाथ खडसे यांनी कोरोनावरून दिलेली प्रतिक्रिया ही सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणारी आहे. मात्र त्यावर मी त्यांना माझ्या भाषेत उत्तर देणार आहे. ते माझे संस्कार नाहीत. मात्र नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्वर सदबुध्दी देवोत, असं वक्तव्य देखील गिरीश महाजन यांनी केलं आहे.
कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…
प्रसार माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की मला कोरोना झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काल माझ्यावर खोचक टीका केली. त्यांनी थेट विकृतीचा कळस गाठून अतिशय खालच्या स्तरावरून कॉमेंट देखील केली. खरतरं नाथाभाऊंचा स्वभाव बघता आणि आजवर त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा इतिहास बघता त्यांनी केलेल्या वक्तव्याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. मात्र त्यांनी दिलेल्या या वक्तव्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचे सिध्द करणारे आहे असंच वाटत आहे असं देखील महाजन यांनी म्हटलं आहे.
Read also:
- गिरीष महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल – एकनाथ खडसे
- …म्हणून महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना आवडतो; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजप नेते गिरीष महाजन अडचणीत; पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी
- शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
- देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?