कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी राजकारण तापण्यास सुरुवात झाली होती. महाविकास आघाडीमध्ये उभी फूट या निवडणुकीदरम्यान पडली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज बंटी पाटील, आमदार विनय कोरे यांनी वेगळी मोट बांधली होती. त्यांना आव्हान म्हणून शिवसेनेने देखील आपला विरोधी पॅनल घोषित केला होता.
कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…
आता जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागला आहे. हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांना शिवसेनेने चांगलाच धक्का या निवडणुकीत दिला आहे. शिवसेनेने तीन तर सोबत एक अपक्षही निवडणून आणून दाखवत ‘हम किसी से कम नही’ असा संदेश सत्तारूढ गटाला दिला आहे. आता लवकरच जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड होणार असून यामध्ये देखील शिवसेनेला चांगलाच भाव दिला जाणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ‘आमचं ठरलंय, हे घोषवाक्य होते.
देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
या वाक्यात जे काही ठरलं होतं त्यातून आम्ही बाजूला झालेलो नाही. पण, कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, बाजार समितीसह आगामी इतर निवडणुका लढवायचे हे ‘आमचं नवीन ठरलयं,’ हे लक्षात ठेवावे असं वक्तव्य करून खासदार संजय मंडलिकांनी खळबळ माजवून दिली आहे.
शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
काहींनी म्हटलं होतं की कोल्हापुरात शिवसेनेची सहकारात ताकद काय ? असं आम्हाला कोणी तरी विचारलं होतं. तर आता लक्षात घ्या की गोकुळमध्ये आमचे ६ संचालक आहेत तर जिल्हा बँकेत ४. त्यामुळे आमची ताकद ही नक्कीच वाढलेली आहे आणि यापुढे सहकारात आम्हाला विश्वासात घ्यावेच लागेल असं देखील मंडलिकांनी म्हटलं आहे.
Read also:
- आम्हाला महाविकास आघाडीमध्ये कोणीच विचारत नाही; आमदार शहाजी पाटलांचा शिवसेनेला घरचा आहेर
- बुधवारपेठेच्या वक्तव्यावरून गिरीष महाजनांनी खडसेंना सुनावलं; म्हणाले, त्यांचं डोकं फिरलं…
- गिरीष महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल – एकनाथ खडसे
- …म्हणून महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना आवडतो; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजप नेते गिरीष महाजन अडचणीत; पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी