पुणे : गेली तीन-चार पिढ्या झाली येथील जनता आशेचा किरण घेवून बसली आहे. अनेकवेळा विमानतळाची जागा बदलण्यात आली. सुरूवातीच्या काळात आमच्याच काही लोकांनी खेडमध्ये होणा्या विमानतळाला विरोध केला होता. त्यामुळे, प्रस्तावित विमातळाची जागा बदलण्यात आली. परंतू, आता लोकांचा विरोध पुर्णपणे मावळला आहे. मला खात्री आहे की, राज्याचे नेते शरद पवारसाहेबांनी मनात आणल आणि ठरवलं तर खेडमध्ये विमानतळ होवू शकते. त्यासाठी जे-जे कराव लागेल ते-ते आम्ही करू, यात कोणतेही राजकाण नाही, असा विश्वासही राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी व्यक्त केला आहे.
आता आमचं नवीन ठरलंय; जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीआधीच खासदार मंडलिकांनी उडवली खळबळ
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेला साईट क्लिअरन्स म्हणजे जागा परवानगी नाकारली आहे. जागेच्या प्रश्नावरून कायम चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
४० वर्ष भाजपात होतो तेव्हा एकनाथ खडसे चांगला, अन् आता लगेचच वाईट? खडसेंचा भाजपला सवाल
मोहिते पाटील म्हणाले, खेड तालुक्यातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी विमानतळाची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे तालुक्यातील एमआयडीसीचे सर्व टप्पे आणि उर्वरित एसईझेड प्रकल्पाच्या विकासाला चालना मिळेल. पिंपरी चिंचवड, भोसरी, रांजणगाव आणि चाकण या औद्योगिक क्षेत्रांना हा विमानतळ जवळचा असणारा आहे. म्हणून उद्योजकांकडूनही या परिसरात विमानतळ असावा, विमानतळ पुरंदरऐवजी खेड तालुक्यातील ‘एसईझेड’च्या जागेत करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच पुणे, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांतील औद्योगिक पट्ट्यासाठी हा विमानतळ मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने सोयीचा ठरणार आहे. शिवाय भुसंपादित करण्यात येणाऱ्या भागातील युवकांना रोजकार उपलब्ध होईल, असेही मोहिते पाटील म्हणाले.
आमदार लांडगेच्या मागणीला कोल्हे, आढळरांवाचा पाठींबा
खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ उभारण्याबाबत पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांनी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आवाहन करणारे पत्र लिहिले. शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही आमदार लांडगे यांनी खेडमध्ये विमानतळ होण्याबाबत सहकार्य करावे, अशी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आढळराव पाटील यांनी खेड तालुक्यात विमानतळ होण्याबाबत आम्ही आमदार लांडगे यांच्या पाठिशी खंबीरपणे आहोत, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे.
शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला
तसेच, खेडमध्ये होणारे विमानतळ पुरंदर तालुक्यात का गेले? याचा अभ्यास करण्याबाबत संबंधित कागदपत्रे पाठवून सूचित केले आहे. दुसरीकडे, विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनीही आमदार लांडगे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच, खेडमध्ये विमानतळ व्हावे.यासाठी सोबत पाठपुरावा करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे खेडमधील प्रस्तावित विमानतळाच्या मुद्यावर आमदार लांडगे यांच्या सोबत कोल्हे आणि पाठिशी आढळराव पाटील आहेत, अशी राजकीय स्थिती पहायला मिळत आहे.
Read also:
- पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
- पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
- राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
- पूलाच्या कामाला चतुराई दाखवली तशी रस्ता, खावटी योजनेचे पैसे, पोषण आहारालाही दाखवा – चित्रा वाघ
- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे