नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात इम्पेरिकल डेटा मिळवण्याच्या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांचं एकमत झालं. दरम्यान, काँग्रेस नेते नसीम खान यांनी उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काल भाष्य केलं. या सगळ्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया दिली गेली असून, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
खडसेंना दणका; ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश
“आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, काँग्रेसकडून ही राजकीय स्टंटबाजी केली जात आहे. केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी ही मागणी असून, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसकडून पहिल्यांदाच अशी मागणी का करण्यात येत आहे? केंद्राने आता राज्याला अधिकार दिले आहेत, निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. त्यांच्या मनात ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. त्यामुळे, हे त्यांच्या जागेवर सुभेदार आणि पैसेवाले आणून डल्ला मारण्याचं कारस्थान आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
तसेच, “या सरकारने आधीच मराठा-ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. जे आरक्षण होतं, ते संपत चाललं आहे. त्यामुळे, कालच्या बैठकीत फडणवीसांनी सुचवलेला सल्ला अंमलात आणावा. त्यांनी जे मुद्दे मांडले, त्याची सरकार अंमलबजावणी का करत नाही?, असा सवाल करत, “वडेट्टीवारांच्या भूमिकेवर संशय नाही. पण या सरकारमधील मोठ्या गटाचा ओबीसी आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळे, ३ महिन्यात डाटा गोळा करावा, आरक्षण टिकवावं, नाही तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा त्यांनी दिला.
Read Also :
- १२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
- तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?
- “भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान
- चुकीचे वागणाऱ्यांची शहनिशा करणे आमचे कामच; नगरसेवकांवर दाखवलेल्या अविश्वासाला अजितदादांचा पाठींबा
- ईडीच्या माध्यमातून भाजप आम्हाला बदनाम करतयं, खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी – जयंत पाटील