पुणे : पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी ‘ED’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांविरोधात मोठे पाऊल उचलले असून, खडसे आणि कुटुंबीयांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र ED ने दाखल केले आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी यांच्यासह अजून २ नावांचा समावेश असून, या प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ‘ED’ने अटक केली आहे.
ईडीच्या माध्यमातून भाजप आम्हाला बदनाम करतयं, खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी – जयंत पाटील
खडसे आणि चौधरी यांनी भोसरी येथील ३१.०१ कोटी रुपयांची ही जमीन ३.७५ कोटी रुपयांना चौधरी यांच्या नावे खरेदी केली. तसेच जमीन खरेदीचे पैसे ५ कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आले. या कंपन्यांकडून कर्जाच्या माध्यमातून हे पैसे घेतले असल्याचा दावा चौधरी यांनी केला. पण तपासात या कंपन्या बंद असल्याचे उघड झाले. त्यामुळे, खडसे यांनी महसूल मंत्री असताना त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आणि ही जागा मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत चौधरी यांना मिळवून दिल्याचा आरोप ‘ED’ने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
दरम्यान, याप्रकरणी ‘ED‘ने खडसेंना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार पहिल्या समन्सनंतर त्यांनी चौकशीसाठी ‘ED’ कार्यालय गाठले. मात्र, दुसऱ्या वेळी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत समन्सपासून आणि अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली. त्यानंतर ‘ईडी’ने खडसेंवरील याचिकेची सुनावणी होईपर्यंत कारवाई करणार नाही, अशी हमी दिली आहे. मात्र, आता ‘ईडी’ने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमत
दुसरीकडे, लोणावळा आणि जळगाव इथली मिळून एकूण ५ कोटी ७३ लाख रुपयांची खडसेंची मालमत्ता ‘ED’ ने जप्त केली असून, जावई चौधरी यांच्या अटकेनंतर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे टाळलं आणि एका निवेदनाद्वारे १४ दिवसांची वेळ मागितली होती. मात्र, ‘ED’च्या आजच्या कारवाईमुळे अनिल देशमुखांनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा खडसेंच्या भोवती आपला फास आवळत असल्याचे दिसत आहे.
Read Also :
- अनिल देशमुख प्रकरणात नवी माहिती समोर, आयफोनसाठी केला चौकशी अहवाल लीक
- १२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक
- तिला मरू दे ना…,तु कशाला बदनाम होतोयं…; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून बलात्काराच्या आरोपीला अभय ?
- “भाजपत देखील महिलांना डावललं जातं!”, आमदार मंदा म्हात्रेंचं मोठं विधान
- चुकीचे वागणाऱ्यांची शहनिशा करणे आमचे कामच; नगरसेवकांवर दाखवलेल्या अविश्वासाला अजितदादांचा पाठींबा