नाशिक : ब्राम्हण समाजात संभाजी भिडे अशी नावं ठेवली जात नाहीत. तसेच सरस्वती माता व ब्राम्हण समाजाविरोधात वक्तव्य केल्याने मागील काही दिवसापासून ब्राम्हण समाज आणि मंत्री छगन भुजबळ असा सामाना रंगला आहे. यातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा. अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या नाशिकमधील बैठकीत करण्यात आली आहे.
हेही वाचा…“रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा दावा
मागील काही दिवसापुर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ब्राम्हण समाज छगन भुजबळ यांच्यावर नाराज आहे. यातच भुजबळांना जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती. यातच आता ब्राम्हण व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आखले आहे. यामुळे छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा येत्या आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रिमंडळावर मोर्चा काढला जाईल. अशा इशाराच ब्राम्हण महासंघाने दिलाय.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचं नाफेडच्या अधिकाऱ्यांना पत्र, कांदा प्रश्नी केली ‘ही’ मागणी
दरम्यान, नाशिक येथे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे बारा बंगला परिसरातील ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेत भुजबळांच्या निषेधार्थ बैठक घेण्यात आली. यावेळी ब्राम्हण महासंघआचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे, नाशिकचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक, महंत सुधीरदास पुजारी, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे, कुमार मुंगी, मनसेचे उपाध्यक्ष पराग शिंदे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, शुल्क युजुर्वेद ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष सतीश शुल्क, श्यामसुंदर जोशी, सोनाली कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…बंडखोरांना जनता धडा शिकवणार? लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा सर्व्हे, कोणाला किती जागा ?
हेही वाचा…“पक्षात कोणतीही फुट नाही” शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अर्थ काय ?
हेही वाचा…“पक्ष फोडण्याचे आमच्यात संस्कार नाहीत,” चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…डिनरमध्ये झुणका भाकर, वडापाव, अन् तुतारी, नाशिक ढोलच्या गजरात इंडियाच्या नेत्यांचं मुंबईत जंगी स्वागत होणार
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचं मरण होतंय,” वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल