मुंबई : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती न्यायमूर्ती शिंदे समितीने ठरवली असून त्याला मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली आहे. यातच वाढवडिलांकडे , रक्ताच्या नात्यालाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं असून उठसुट कुणालाही प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलेला नाही. इतर समाजाचं आरक्षण काढायचं आणि दुसऱ्या समाजाला द्यायचं असा निर्णय बिलकुल घेण्यात आला नाही. छगन भुजबळांनी जो संभ्रम निर्माण केला आहे तो चुकीचा आहे. तसेच भुजबळांना असं विधान करण्याची जुनी सवय आहे. असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…‘या’ तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, सगळ्या पक्षांना धक्का देत अपक्षांनी मारली बाजी
काल छगन भुजबळ यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यावरून विरोध दर्शविला. तसेच भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांसह राज्या सरकारवर देखील जोरदार टिका केली. यातच छगन भुजबळ यांचं विधान संभ्रम निर्माण करणारं असून उद्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व प्रमुख नेत्यांच्या कानावर भुजबळांचं वक्तव्य घालणार आहोत. असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“तुम्ही तर आमचा जीव घ्यायला निघालेत”? मनोज जरांगे पाटलांचं भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, ओबीसींच्या आरक्षणाला तिळमात्र धक्का आम्ही लागू देणार नाहीत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार हे एकनाथ शिंदे यांनी १०० वेळा स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळांनी आपलं म्हणणं मुख्यमंत्र्यांकडे मांडवं. परंतु असं संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करणं हे भुजबळांची जुनी सवय आहे. राज्यातील सर्व परिस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थितरित्या सांभाळली आहे. अशा प्रकारचे भडक वक्तव्य करून भुजबळांनी परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही संभूराज देसाई यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट, जिल्ह्यात युतीची ताकद वाढली”
हेही वाचा…“जवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराची होते नांगरट, तवा..,”ठाकरेंवर टिका, सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते अन् ग्रामपंचायत निवडणुका..”, राऊतांनी महायुतीला डिवचलं
हेही वाचा…“पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा”, ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…ग्रामपंचायती निवडणुकीत ठाकरेंना मिळाल्या कमी जागा, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…