जालना : सरसकट मराठ्यांना ओबीसीमधून प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. तर दुसऱ्या बाजूने मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये. अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. यातच जालन्याहून बीडकडे जात असतांना अंतरसराठी गावाजवळ छगन भुजबळ यांचा कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं.
हेही वाचा…मोठी बातमी…! लोकसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार ?
छगन भुजबळ सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा जालना येथे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असतांना त्याठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलतांना आमंत्रणाची वाट न पाहता ओबीसी महामोर्चाला येण्याचं आवाहन केलं आहे. येत्या १७ नोव्हेंबरला अंबडमध्ये ओबीसींचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
हेही वाचा…ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘या’ मंत्र्यांनी केला प्रचार, परंतु उमेदवाराचा झाला दारून पराभव
दरम्यान, आज छगन भुजबळ यांनी बीड येथे मराठा आंदोलनामध्ये जाळपोळ झालेल्या घटनांची पाहणी केली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, व आमदार संदीप क्षीरसागर यांची त्यांनी भेट देखील घेतली. तसेच मराठा आंदोलनादरम्यान बीडमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत यांच्या हॉटेलची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपने तब्बल २०७४ पैकी ६६९ ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला, मुंबईत मोठा जल्लोष
हेही वाचा…भाजप आमदार नमिता मुंदडा यांना मोठा धक्का..! जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अजित पवारांच्या ताब्यात
हेही वाचा…नाशकात अजितदादांची दादागिरी, भुजबळांनीही आपला गड राखला
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी