बीड : बीडमधील नेकनूर ग्रामपंचायत अजित पवार गटाच्या ताब्यात गेल्याने भाजप आमदार नमिता मुंदडा यांना बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. नेकनूर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर संपुर्ण पॅनलवर अजित पवार गटाचे वचस्व राखलं असून नमित मुंदडा यांना धक्का बसला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाशी देखील सरशी बघायला मिळत आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची एंट्री, ‘या’ ग्रामपंचायतींवर बीआरएसने रोवला झेंडा
तर अहमदनगरच्या अकोले मध्ये अजित पवार गट सरस असून अकोले तालुक्यातील सर्व २१ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये अजित पवार गटाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ७, शरद पवार गटाला २ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. अकोलेचे डॉ. किरण लहामटे यांच्या पॅनलला देखील सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा…नगरमध्ये विखे पाटील अन् बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठापणाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल
दरम्यान, राज्यात लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये नाशिक जिल्ह्यात अजित पवारांची दादागिरी बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे एकूण ४८ ग्रामपंचायतींवर शरद पवार गटाला केवळ ५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यातच येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी आपला गड राखला असून याठिकाणी दोन्ही जागा भुजबळ समर्थकांकडे गेल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात अजितदादांची दादागिरी, भुजबळांनीही आपला गड राखला
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
हेही वाचा…कोल्हापूरकरांनी सतेज पाटील अन् धनंजय महाडिकांना नाकारलं, अपक्ष उमेदवाराने मारली बाजी
हेही वाचा…मोठी बातमी…! लोकसभेनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार ?
हेही वाचा…ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘या’ मंत्र्यांनी केला प्रचार, परंतु उमेदवाराचा झाला दारून पराभव