पुणे : आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडणार असून याची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून पाहिली जात आहे. यातच लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांच्या अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात निवडणुकांचा गुलाल हा जोरदार उडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच पुढच्याच वर्षी राज्यात विधानसभेची निवडणुक देखील होऊ घातली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुका होणार असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
आगामी निवडणुकांमध्ये राज्यात सध्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत असून राज्य सरकारने २ जानेवारीपर्यंत आरक्षणासाठी मुदत दिली आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यास याचा मोठा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. यातच भाजप देखील संपुर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
दुसरीकडे २ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे. भाजप प्रत्येक निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत आली आहे. यावेळी देखील राम मंदिराचा मुद्दा भाजप लावून धरण्याची शक्यता आहे. यातच आता लोकसभा निवडणुकांनंतर भाजप लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२४ ला पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तर यातच राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तशी योजना देखील महायुतीतील नेत्यांनी आखली आहे. महायुतीत सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी झाले असून आगामी निवडणुका एकत्रित लढण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ‘या’ मंत्र्यांनी केला प्रचार, परंतु उमेदवाराचा झाला दारून पराभव
हेही वाचा…महाराष्ट्रात ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाची एंट्री, ‘या’ ग्रामपंचायतींवर बीआरएसने रोवला झेंडा
हेही वाचा…नगरमध्ये विखे पाटील अन् बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठापणाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल
हेही वाचा…रोहित पवारांना जोरदार धक्का, कर्जत मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल