नगर : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचा निकाल लागला आहे. याठिकाणी काॅंग्रेस गटाचे काका जठारे यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. तर जिल्ह्यातील दोन निकालामध्ये एक काॅंग्रेसकडे तर एकावर शरद पवार गटाचा विजय झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
संगमनेर तालुक्यातील आश्वि बुद्रूक ग्रामपंचायतीत बाळासाहेब थोरात गटाचा विजय झाला असून याठिकाणी नामदेव किसन शिंदे यांची सरपंच पदी निवड झाली आहे. तर आश्वि खुर्द ग्रामपंचायतीत विखे गटाचा विजय झाला असून महसूलमंत्री विखे पाटील यांच्या स्विय्य सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झाला असून अलका बापूसाहेब गायकवाड विजयी झाल्या आहेत.
“पुतण्याचा काका शरद पवारांना मोठा धक्का, बारामतीत सर्वच ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाची सत्ता”
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं खातं उघडलं आहे. याठिकाणी अजित लकडे जनतेतून सरपंचपदी विराजमान झाले आहेत. तर संगमनेर तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायत मध्ये विखे गटाचा विजय झाला असून याठिकाणी सरपंचपदी नितीन म्हतारबा आहेर विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, अहमदनगरमध्ये कर्जत – जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच, तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय झाला आहे. यातच संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचयातीमध्ये थोरात गटाची सत्ता, सरपंचपदी सोनाली संदीप कर्पे विजयी झाले आहे. यापूर्वी थोरात गटाची सत्ता आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांना जोरदार धक्का, कर्जत मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान