मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियासंह काल शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी केदारनाथाचे दर्शन घेतले. सकाळी १० वाजता ते बद्रीनाथ धामला पोहोचले. यावेळी मंदिर समितीने त्यांचे स्वागत केले. दरम्यान, मंदिर परिसरात असलेल्या अनेक मराठी भाविकांनी जय महाराष्ट्राच्या समर्थनाथ घोषणा दिल्या. यावरून आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केलीय.
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार, ‘या’ माजी मंत्र्याला विधानसभेचं दिलं तिकीट
मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषण करत होते तेव्हा एका बाजूला मराठा आरक्षणाच्या बाजूने काही वक्तव्ये करायची. जरांगे यांची काळजी दाखवायची, प्रक्षोभक बोलून राज्य पेटवायचं आणि दुसरीकडे सगळं घोंगड भिजत ठेऊन काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं. किती तो दुटप्पीपणा असं म्हणत याचमुळे शिल्लकसेनेची ही अवस्था झालीय. जनतेचा कळवळा फक्त राजकारणापुरता. कुठच्या देवाच्या दारात फेडाल ? असा खोचक टोला शीतल म्हात्रे यांनी लगावला.
हेही वाचा…“भाजपचे नेते मोहित कंबोजला कोर्टाचा मोठा दणका, सुषमा अंधारेंनी फडणवीसांचं नाव घेऊन डिवचलं”
दरम्यान, राज्य सरकारचं शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांची पुन्हा भेट घेत मराठा आरक्षणासंदर्भात वेळ वाढवून दिला आहे. त्यासंदर्भात सरकारने जीआर देखील जरांगे पाटलांच्या हातात ठेवला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे कुटुंबीय केदारनाथच्या दर्शनाला रवाना झालेत. त्यावरून त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे.
आदरणीय मनोज जरांगे-पाटील जेव्हा उपोषण करत होते तेव्हा एका बाजूला मराठा आरक्षणाच्या बाजूने वक्तव्य करायची.. जरांगे यांची काळजी दाखवायची, प्रक्षोभक बोलून राज्य पेटवायचं आणि दुसरीकडे सगळं घोंगड भिजत ठेऊन काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथाच्या दर्शनाला निघून जायचं… किती… https://t.co/xjA7gaqk4m
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) November 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?
हेही वाचा…काकाची पुतण्याच्या मतदारसंघात एंन्ट्री..! राज ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल