मुंबई : आगामी महिन्यात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा गुलाल उधळणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून प्रचाराचा धडाकाही सुरू झाला आहे. यातच पक्ष फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सहीचा एबी फार्म घेऊन राज्यातील एक मंत्री राजस्थानमध्ये पोहचले असून धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढवली जाणार आहे.
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
राजस्थान विधानसभा निवडणुकीत आता शिंदे गट उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीचा एबी फार्म राजस्थानमध्ये घेऊन जाणार आहेत. उदयपुर वाटी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री राजेंद्रसिंह गुढा धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत.
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”
दरम्यान, राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून २०० जागा असलेल्या राजस्थानच्या विधानसभेसाठी २३ नोव्हेंबर मतदान पार पडणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष फुटीनंतर शिंदे आपला उमेदवार देणार आहे. त्यामुळे याकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपचे नेते मोहित कंबोजला कोर्टाचा मोठा दणका, सुषमा अंधारेंनी फडणवीसांचं नाव घेऊन डिवचलं”
हेही वाचा…“जनतेशी नाळ जोडलेला आमदार भाजपने गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन”
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर
हेही वाचा..“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया