मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचा निर्धार नवपर्वाचा राज्यव्यापी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यांचा आरंभ होणार आहे. या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात पुर्व विदर्भातून ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. तसेच या राज्यव्यापी दौऱ्याच्या वेळी घोषवाक्य देखील ठरवण्यात आलं आहे.
हेही वाचा…“प्रकाश सोळंकेंना फोनाफोनी करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, त्याच फोनमुळे बंगला अन् गाड्या पेटवल्या
सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवार गटाच्या राज्यव्यापी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळव्याची माहिती दिली. घड्याळ तेच वेळ नवी हे घोषवाक्य घेऊन, राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून, पक्षसंघटनेला अधिक बळकटी देण्यात येणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट”, वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दरम्यान, या राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या भूमिकेची मांडणी जनतेसमोर केली जाईल. जनतेसमोर जाण्याची जेव्हाही आम्हाला संधी मिळाली आहे तेव्हा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. ‘घड्याळ तेच, पण वेळ नवी’ म्हणजे काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, काळानुरूप व्यवस्थेत आणि राजकारणात बदल होतो. त्यामुळे अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनता विश्वास दाखवेल, असा विश्वास सूनील तटकरे यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘निर्धार नवपर्वाचा’
राज्यव्यापी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यांचा होणार आरंभराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘निर्धार नवपर्वाचा’ या राज्यव्यापी दौऱ्याची पूर्व विदर्भातून ५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी आज… pic.twitter.com/VEVipz2jU7
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
हेही वाचा“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल