अकोला : भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांची कर्करोगाशी झुंज काल अपयशी ठरली आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गोवर्धन शर्मा हे अकोला पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. तसेच गोवर्धन शर्मा हे गेल्या पाच टर्मपासून भाजपचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यात दु: ख व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी
अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. जनतेशी नाळ जोडलेले आमदार अशी गोवर्धन शर्मा यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने अकोला जिल्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक महान व्यक्तीमत्वाला मुकला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु: ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे. अकोला जिल्ह्यात पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध जबाबदार्या सांभाळत पक्षविस्तारात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले.
हेही वाचा..“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्यांमधून त्यांनी जनतेची सेवा केली. विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तर त्यांनी केलाच. पण, या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठे कार्य केले. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अगदी अलीकडे मुंबईत त्यांना उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. राममंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो.
अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती.… pic.twitter.com/ni7yR6OMq6
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2023
अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. जनतेशी नाळ जोडलेले आमदार अशी गोवर्धन शर्मा यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने अकोला जिल्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक महान व्यक्तीमत्वाला मुकला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास… pic.twitter.com/96hOEtVl3c
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर
हेही वाचा..“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”