मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर धक्कादायक आरोप करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्यावरील प्रकरणावरूनच पुण्यातील एका कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं मीरा बोरवणकर यांनी सांगितलंय.
हेही वाचा…काकाची पुतण्याच्या मतदारसंघात एंन्ट्री..! राज ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल
मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिसनर या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे. त्यावरून मागील काही दिवसापासून मीरा बोरवणकर विरूद्ध अजित पवार असा राजकीय द्वंद्ध रंगला आहे. या प्रकरणाची चर्चा होत असतांना अचानकपणे बोरवणकर यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या दबावामुळेच पुण्यातील कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार, ‘या’ माजी मंत्र्याला विधानसभेचं दिलं तिकीट
मॅडम कमिशनर या पुस्तकाच्या वाचनाचा कार्यक्रम २५ नोव्हेंबर रोजी चंदिगडमध्ये होता. त्यानंतर २६ नोव्हेंबरला पुण्याच्या कार्यक्रमांचं निमंत्रण होतं. त्यांना मला निमंत्रण दिल्यानंतर तीन चार दिवसांनी फोन केला. आयोजकांनी कारण सांगताना त्या लेखिकेलाच पुढे केलं. आम्ही दोन तीन दिवसांपासून विचार करत होतो की आपल्याला कसं सांगावं. आता आपल्याला हा कार्यक्रम घेता येणार नाही. कारण अजितदादा यांच्याशी संबंधित जे प्रकरण झालंय. मला एकदम धक्का बसला. मला माहिती आहे की, काही ना काही असा प्रतिसाद असणार, कारण आपण राजकीय नेत्याबद्दल बोलले असं मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?