भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती लागला आहे. भंडारा जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं मतमोजणी सुरू झाली आहे. या निकालामध्ये मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे भूपेंद्र नगफासे विजयी झाले असून ही जागा अजित पवार गटाला मिळाली आहे. तर मोहाडी तालुक्यातील बच्छेरा येथे उमाबाई मेश्राम ही देखील ग्रामपंचायत अजित पवार गटाच्या ताब्यात गेलीय.
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
यातच महाराष्ट्रात २३५९ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. यातच महाराष्ट्रात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री झाली आहे. भंडाऱ्यातील क्रांती ग्रामपंचायतींवर बीआरएसची सत्ता आली आहे. मागच्या झालेल्या निवडणुकीत देखील बीआरएस पक्षाचा सरपंच निवडून आला होता.
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेने खातं उघडलं आहे. जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा रोवला आहे. या ग्रामपंचायतीत संगीता कैलास गायकवाड यांना ५५८ मते मिळाली असून त्यांची थेट सरपंच पदी निवड झाली आहे. तर विरोधी उमेदवार ठाकरे गटाच्या सीमा भाऊसाहेब पागेरे यांना ३९४ मते पडली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नगरमध्ये विखे पाटील अन् बाळासाहेब थोरातांची प्रतिष्ठापणाला, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल
हेही वाचा…रोहित पवारांना जोरदार धक्का, कर्जत मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका