मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकराने घेतला. त्यानंतर औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे, असं समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अबू आझमी यांच्यावर टीका केली आहे.
“हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
औरंगाजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही, असं संभाजीराजे यांनी ट्विट करत अबू आझमी यांच्यावर टीका केली आहे. अबू आझमी महाराष्ट्रात काय राहतायत? त्यांची असं बोलण्याची हिम्मत कशी होते? असा सवाल उपस्थित करत अशा व्यक्तींना सर्वात आधी महारष्ट्रच्या बाहेर फेकले पाहिजे, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
महाराष्ट्रात औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद या तीन शहरांच्या नावात मुुस्लिम नाव आहे. ही तीन नावं बदलल्याने जर महाराष्ट्रातील जनतेला नोकरी मिळणार असेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार असतील, विकास होणार असेल तर मी नामकरणाचं स्वागत करेन असं आबू आझमी म्हणाले.
“आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
औरंगाजेब हा वाईट नव्हता. औरंगजेबचा खरा इतिहास लोकांसमोर आणला तर कोणत्याही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने त्यांचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे तुम्ही राम पुनियानी यांना भेटा, ते मुस्लीम नाहीत. पण त्यांना औरंगजेबाबत विचारा, औरंगजेब चांगला मुसलमान होता, याची हजारो उदाहरणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने कधीही हिंदू-मुस्लिमांमध्ये लढाई केली नाही, असही अबू आझमी म्हणाले.
Read also
- “अजित पवार आणि जयंत पाटील हे राजकारणातील राम लक्ष्मणाची जोडी”
- “लोकशाहीच्या वस्त्रहरणाला आता जनतारुपी कृष्णच थांबवू शकतो”
- “अब्दूल सत्तारांना शिंदें सरकारमध्ये शिक्षण खातं मिळेल”; TET परिक्षा घोटाळा प्रकरणी टिका
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे,तर देशात राहण्याचा अधिकार नाही. pic.twitter.com/f2pwV2lOiE
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 7, 2022