मुंबई : सध्या महागाईविरोधात काॅंग्रेसने केंद्र सरकार आणि भाजपविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. पावसाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद बघायला मिळाले. तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरव्यवहार होत असल्याचा देखील आरोप विरोधी पक्ष भाजपवर सातत्याने करीत आहेत. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यावरून काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला
शिवसेनेचा अंत हा आता जवळ आला आहे. तसेच देशात सर्व प्रादेशिक पक्ष संपवण्याच्या वाटेवर असून भविष्यात फक्त भाजपच शिल्लक राहणार असल्याचं वक्तव्य जे. पी, नड्डा यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यावरून सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, भाजपा व संघ भारताला रशिया आणि चीनच्या मार्गावर घेऊन चालली आहे. जे पी नड्डा यांनी हेच म्हटले आहे. शिवसेना संपवण्याच्या व आता बिहारमधील जेडीयू संपवण्याच्या प्रयत्नांतून लोकशाही संपुष्टात आणण्याचे कारस्थान अधोरेखित होते. लोकशाहीच्या वस्त्रहरणाला आता जनतारुपी कृष्णच थांबवू शकतो. त्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
त्याचबरोबर स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने हर घर तिरंगा हा अभियान सुरू केलं आहे. तसेच सोशल मीडियावर देखील तिरंगा ध्वज ठेवण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे. त्यावरून देखील देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, तिरंगा फडकवणे ही भाजपासाठी इव्हेंट आहे. परंतु आमच्यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना आहे. इव्हेंटबाजीच्या पलिकडे या गौरवास्पद क्षणाला पहावे. १५ ऑगस्टनंतर राष्ट्रध्वजाचा अवमान होता कामा नये ही जबाबदारी प्रत्येकाची व प्रशासनाची आहे. राष्ट्रप्रेम १५ ऑगस्टनंतरही दिसले पाहिजे.
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काॅंग्रेससह विरोधी पक्ष भाजपवर विविध मुद्दांवरून हल्लाबोल करीत आहेत. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील राजकीय वातावऱण चांगलंच चिघळलं आहे. यावरूनच सचिन सावंत यांनी यावर खोचक टिप्पणी केली आहे.
Read also
- “अब्दूल सत्तारांना शिंदें सरकारमध्ये शिक्षण खातं मिळेल”; TET परिक्षा घोटाळा प्रकरणी टिका
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक