पुणे : पुण्यात टीईटी (TET) घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेने यासाठी परिपत्रक काढत कारवाईचे आदेश दिले आहेत. या परिपत्रकात शिवसेनेेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे समोर आली आहेत. यावरून आता विरोधकांनी सत्तारांना लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधाला आहे. आता शिंदे सरकारमध्ये सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील असं पृथ्वीराज चव्हण म्हणाले.
“एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल, असा टोला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. राज्यात उपस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणत खातं मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी खपवून जातात, असं पृथ्वीराज चव्हण म्हणाले.
“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
2019-2020 मध्ये टीईटी परीक्षा झाली होती. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. परीक्षेचा निकाल 28 ऑगस्ट 2020 लागला होता. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला होता. यामध्ये 16 हजार उमेदवार हे पात्र ठरवलेले होते. यापैकी अनेक उमेदवार हे घोटाळा करून पास झाल्याचे समोर आले. यासोबतच आता 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणाी करण्यात येणार आहे. या परीक्षेत जवळपास 7 हजार 880 उमेदवार हे बोगस असल्याची माहिती समोर आली आहे.
“राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध झालेली यादी ही 2019 मधील आहे. माझ्या मुलींनी 2020 मध्ये परीक्षा दिली होती. त्यात त्या परीक्षेत माझ्या मुली अपात्र ठरल्या होत्या मग या यादीत त्यांचे नाव येण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या चार वर्षात जर माझ्या संस्थेकडून या संदर्भात शिक्षण विभागाला एखादे जरी पत्र गेले असेल, तर आमच्यावर बिनधास्त कारवाई करा. हा माझ्या बदनामीचा कट आहे. या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर करवाई करावी, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
Read also
- “तर माझ्यावर बिनधास्त कारवाई करा,” अब्दुल सत्तार यांचं ओपन चॅलेंज
- “भाजपची सत्ता जसजशी आली, तसतशी प्रगतीची चाकं उलटी फिरायला लागली”
- “हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे”
- महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक
- “आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका”; रोहित पवारांचा राणेंना टोला