मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तुलना वेस्ट इंडिचा अॅम्ब्रोजसोबत केल्याने शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव टिकेचे धनी झाले आहेत. काल एका जाहीर कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी बावनकुळेंवर टिका केली होती. त्यावरून आता भास्कराव जाधव यांना भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून धंगेकरांची फडणवीसांवर जोरदार टिका, म्हणाले, घोषणा केल्या पण…,
उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत उरलेल्या लोकांचंही मानसिक संतुलन ढासळत चाललं आहे. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांच्या रंगरुपावरून टीका केली आहे. भास्कर जाधव यांच्या वृत्तीचा मी निषेध करतो. यातून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची ओबीसींकडे बघण्याची नीच वृत्ती दिसत आहे. आजही भास्कर जाधव ओबीसींना अस्पृश्य मानतात का? असा सवाल भाजप आमदार राम सातपुते यांनी केली आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”
दरम्यान, बावनकुळे यांच्या रंगरुपावर टिप्पणी करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडाचा रंग उडाला आहे. यापुढे तुम्ही ओबीसी आणि मागास समाजाच्या रंगरुपावरून टीका केली. तर समस्त ओबीसी आणि मागासवर्गीय समाज निवडणुकीत तुम्हाला बेरंग केल्याशिवाय राहणार नाही. असा सज्जड दम देखील त्यांनी जाधवांना दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..चंद्रकांत पाटलांना हटवा अन् अजितदादांना अध्यक्ष करा; मराठा आरक्षणाच्या बैठकीत नेत्यांचा सूर!
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस, ठिक १२ वाजता ‘या’ दिवशी होणार सुनावणी
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात”, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“महाराष्ट्रातले सगळे सध्या राजकारणी सत्तेला भूकेले, आग लावायची कामं सुरू,” मराठा आरक्षणावरून खोतांची टिका
हेही वाचा…अजित पवार गटातील विधान परिषदेतील ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू