कोल्हापुर : पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी कोल्हापुर पोटनिवडणुकीत आघाडी घेतली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे. अकराव्या फेरीपर्यंत जयश्री जाधव यांचीच आघाडी असल्याने निकाला आधी आता जयश्री जाधव यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. तर मात्र कोल्हापुर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करूणा मुंडे यांना फक्त 61 मतं पडली आहेेत.
हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
कोल्हापुर मतमोजणीचा अंतिम निकाल येण्यासाठी अजून तीन तासाचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्याआधी कोल्हापुर शहराच्या अनेक भागांमध्ये काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स देखील लागले आहेत. काॅंग्रेस नेते आणि कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा उल्लेख किंगमेकर असा करण्यात आला. तर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे देखील या बॅनर्सवर फोटो दिसून येत आहेत.
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
सोळाव्या फेरीत काॅंग्रेसकडे 3638 तर भाजपकडे 3847 मत आघाडी घेतली आहे. यावेळी भाजपकडे आता 209 लीड आहे तर काॅंग्रेसने या संपुर्ण फेरीत 13789 मतांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 39,605 तर सत्यजित कदम यांना 31,512 मते मिळाली आहेत. 8073 मताची आघाडी आहे. तर 8 हजार मतानी जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांच्यावर आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत पोटनिवडणुकीत काॅंग्रेस पहिल्यापासून आघाडीवर आहे. मात्र दहाव्या फेरीनंतर करूणा मुंडे यांना फक्त 61 मत मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.
“ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
दरम्यान, कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीचा गुलाल महाविकास आघाडी उधळणार असा आशावाद जयश्री जाधव यांनी मांडला आहे. कोल्हापुरचा स्वाभिमान जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे सुरूवातीपासून आघाडीवर असलेल्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
Read also:
- करूणा मुंडेना कोल्हापुर पोटनिवडणुकीत अवघी 61 मत; काॅंग्रेस, भाजपविरोधात तक्रार दाखल करणार
- कोल्हापुर पोटनिवडणुक निकाल ! काॅंग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी घेतली आघाडी
- “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी! ते मुस्लिम, तर हे हिंदू समाजाला भडकविण्याचं काम करताहेत”
- मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
- आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;