मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी येत्या 3 तारखेचं अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलाचं तापलं आहे. त्यावरून राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमला सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यावर आपलं मत व्यक्त करत राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार
मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता सल्ला दिला आहे. सध्या देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ होत आहे. लोकांच्या समस्यांवर त्यांनी बोललं पाहिजे. गेल्या 60 वर्षापासून ह्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे त्यांनी इतर मुद्द्यांकडे लक्ष न देता त्यांनी यावर बोललं पाहिजे असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता सल्ला दिला आहे.
सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
राज ठाकरे यांची 12 एप्रिल रोजी ठाण्यात जाहीर सभा झाली. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, येत्या 3 तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे जर खाली उतरले नाहीत. तर त्यापुढे हनुमान चालिसा मोठ्या आवाजात लावण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर गृहमंत्र्यांनी जर कायद्याचा गैरवापर झाला तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पेंग्विन, म्याऊ म्याऊ, कोंबडा, अन् आता म्हैस, नागाचा फणा; राज्यातील राजकारण कुठं चाललंय ?
दरम्यान, राज ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मनसे कार्यक्रत्यांनी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर येत असून ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे . या उत्सवास राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार असून राज ठाकरे यांच्या शुभहस्ते महाआरती होणार आहे. तसेच सामूहिक महाआरती देखील होणार आहे.
Read also:
- हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
- लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
- “ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
- “मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी