मुंबई : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात भुमिका मांडली होती. त्यानंतर त्याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात पडले होते. पुण्यातील अनेक मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. तर वसंत मोरे यांनी त्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत देखील त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलेत. त्याचा परिणाम म्हणून आता मनसेच्या एकुण आता पर्यंत 35 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
“मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यानंतर पुण्यात मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत. कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाचा राजीनामा देत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा जय महाराष्ट्र अशी पोस्ट करत मनसेला रामराम ठोकला. खंर तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं.
मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार
मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो. तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो. त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वत: पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई व मराठवाडा विभागातील एकुण 35 मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
सोमय्यांचा निशाणा आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हाण्यावर! 29 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
दरम्यान, फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमुद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहारध्यक्ष, प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतुक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्वाच्या पदांवरिल पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Read also:
- आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
- हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
- लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
- “ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
- तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान