पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबतची भूमिका त्यांच्या अंगलट आली आहे. कारण आज मुंबईसह विदर्भातील 35 मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याचा 3 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यावरून त्यांच्यावर सगळीकडून टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रवक्ते, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे नवे ओवेसी असं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेत आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तुम्ही फक्त मातोश्रीवर येऊन तर दाखवा; किशोरी पेडणकरांचं रवी राणांना खुलं आव्हान
सुरज चव्हाण म्हणाले की, राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे ओवेसी आहेत. ते ओवेसी मुस्लिम समाजाला भडकविण्याचं काम करतात आणि हे ओवेसी हिंदू समाजाला भडकवण्याचा काम करतात. दोघांचाही उद्देश एकच आहे. दोघांचीही मातृसंस्था एकच आहे. फुले-शाहु-आंबेडकरांना मानणारा हा महाराष्ट्र आहे. राज ठाकरे यांनी लक्षात ठेवाव, याठिकाणी विचारांना थारा दिला जात नाही, असंही ते म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे”; रवी राणा यांची मागणी
विकासाची ब्लू प्रिंट घेऊन राजकारणात उतरलेले राज ठाकरे मातृसंस्थेच्या आदेशानंतर आज ती ब्लु प्रिंट बंद केलेली आहे. महागाी बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा मुळ मुद्दांना बगल देऊन हिंदू समाजाची माथी भडकविण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. माझं राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळीना खुलं आव्हान आहे. त्यांनी हनुमान चालिसा न वाचता न बघता म्हणून दाखवावी. जर राज ठाकरे खरे हिंदू असतील तर त्यांनी हनुमान चालिसा म्हणून दाखवावी असंही ते म्हणालेत.
मनसेच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाला वसंत मोरे जाणार नाहीत? राज ठाकरे उपस्थित राहणार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसेचं राजकारण राज्याच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. मनसेने घेतलेली मशिदीवरील प्रकरण आता चांगलचं तापलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण वेगळ्याच वळणावर गेलं आहे.
Read also:
- मुंबईसह विदर्भातील एकुण 35 कार्यकर्त्यांनी ठोकला मनसेला रामराम! मशिदीवरील प्रकरण मनसेला भोवलं
- आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरे यांना सल्ला !म्हणाले की, मशिदीवरील भोंग्यापेक्षा..;
- हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला जाणार की नाहीत; वसंत मोरेंनी स्पष्ट सांगितलं
- लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा! भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांची रूग्णालयात भेटण्यासाठी रिघ
- “ते 100 टक्के खरं आहे”; मुंबई बॉम्ब स्फोटांबाबत शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर