चंद्रपुर : महायुतीकडून भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ही जागा कॉंग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. मात्र कॉंग्रेसकडून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेड्डीवार आणि माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.
हेही वाचा…सांगलीच्या जागेवरून ठाकरे अन् कॉंग्रेसमध्ये मोठी लढाई ; महाविकास आघाडीचे नेते आमनेसामने
उमेदवारी आपलीच आणि विजयही आपलाच अशा आशयाचे ट्विट वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोकर यांनी केले आहे. त्यामुळे चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर असतील की शिवानी वडेट्टीवार अशा चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी सोमवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे ट्विट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा…जागा वाटपात ठाकरे मोठा भाऊ, २२-१६-१० लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला
दरम्यान, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये चंद्रपुर, रामटेक, गोंदिया-भंडारा, गडचिरोली-चिमूर, नागपुर या विदर्भातील मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून आता कुणाला उमेदवारी देण्यात येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघात कॉंग्रेस अन् भाजपमध्ये होणार कडवी टक्कर ; राजकीय गणितं काय ?
हेही वाचा…‘शिर्डी आठवलेंना सोडा, अन्यथा, मावळ अन् शिरूरमध्ये…’ आरपीआयने दिला महायुतीला कडक इशारा
हेही वाचा…महायुतीत सामील झाल्यास मनसेला मिळणार दक्षिण मुंबई, तर महायुतीला ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा फायदा
हेही वाचारक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून भाजपात बंड, असंख्य कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
हेही वाचा“सख्खा भावाने अजित दादांना खडसावलं ; अजित पवार गटाकडून दिलं जोरदार प्रत्युत्तर”