मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विरोधी पक्षातील नेते शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. यातच फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. यावरूनच काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.
“अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहत असलेला सागर बंगला हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लगावला आहे. आज रश्मी शुक्ला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतली आहे. या नंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी याविषयी फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच शुक्ला यांना पुन्हा महाराष्ट्रात बोलावले जाणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
“शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”
सध्या राज्यातील सगळं राजकारण वेगळ्या दिशेनं जात आहे. जे काही घडत आहे त्याकडे महारष्ट्राचेच नाही तर देशातील जनतेचं लक्ष आहे. जे काही घडत आहे ते लोकशाहीला हानिकारक आहे. ना राज्यघटने प्रमाणे आहे. त्यामुळे आम्ही सर्व मिळूण या गोष्टीचा विरोध करत आहे, असही काँग्रेसचे नेेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
“एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”
महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत. त्यांची चौकशी करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्या केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
Read also
- 50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
- “तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
- “संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
- “धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
- “शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”