मुंबई : राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटण्यासाठी तुरूंगात जाणार आहे, असं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं आहे. त्यानंतर राज्यात एकच चर्चा रंगली आहे की, राष्ट्रवादीचा तो नेता कोण? यासोबत त्यांनी सिंचन घोटाळ्याचा देखील उल्लेख करीत अजित पवारांकडे बोट दाखवलं आहे. यावरून आता राज्यातील विविध नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”
कोणताही घोटाळा असो त्याची फाईल बंद करू नये. जोपर्यंत त्यामध्ये काही केलेले सिद्ध होत नाही किंवा शिक्षा झाली पाहिजे. कारण ही लोकांची भावना आहे. लोकांना वाटतं की जनतेचा पैसा कोणी नेता खात असेल तर त्याला तो पैसा पचू नये. ही जनतेची भावना देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार त्याचा आदर करतील. त्याचबरोबर एकनाथ आणि देवेंद्र ही देवांची नावे आहेत. नाना पटोले यांनी इडी इडी जर केलं तर एकनाथ आणि देवेंद्रच नाव घेतलं. तर त्याच भलं होऊन जाईल, अशी खोचक टिप्पणी त्यांनी नाना पटोले यांच्यावर देखील दिली.
अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. तो काय पुर्णवेळ ईडीच्या कार्यालयात बसतो का याची कारवाई व्हायला हवी असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टोला लगावला आहे. मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का. याला कसं माहिती पडतं की ईडी आणि सीबीआय कुठे कारवाई करणार आहे. हा ईडी कार्यालयात पुर्णवेळ बसणारा नेता आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा फक्त भाजपचा भोंगा आहे. त्याला दुसरं काहीही जमत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर चर्चा भरकटवण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
“50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
दरम्यान, भाजपकडून देखील यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं आहे की, मोहित कंबोज यांच्या बोलण्यामागे काही तरी तथ्य असणार आहे. त्यामुळेच त्यांनी ट्विट केलं आहे. तर भाजपचे आमदार राम सातपुते यांनी देखील चौकशीला सामारे जाण्याचे आवाहन राष्ट्रवादीला दिलं आहे.
Read also
- ” मंत्रिमंडळात बदल करून सत्तारांना शिक्षण मंत्री, राठोडांना महिला व बालकल्याण, तर सुर्वेंना गृहमंत्री करा” रूपाली पाटील
- “सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
- “विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी
- “शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री