मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्याने व एकाही महिला आमदारांना मंत्रिपद न दिल्याने विरोधी पक्षाचे नेते शिंदे सरकारवर वारंवार टिका करताना दिसत होते. आता मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी शिंदे सरकारवर टिकास्त्र सोडले आहे.
अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
अमित शहा साहेबांच्या मर्जीने विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारमधील मंत्रिमंडळात काही फेरबदल व्हावेत, असं म्हणत त्यांनी अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री, संजय राठोड यांना महिला व बालकल्याण मंत्री, प्रकाश सुर्वे यांना गृहमंत्री हा खाती देण्यात यावीत, अशी टिका राष्ट्रवादी्च्या रूपाली पाटील यांनी केली आहे. सध्या अब्दूल सत्तार यांच्याकडे कृषी तर संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद शिंदे सरकारकडून देण्यात आलं आहे.
“50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिर न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही नेत्यांना वाटप न केलेले विभाग असतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती आहेत.
“हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार यांना वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास, गिरीष महाजन यांना ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, मंगलप्रभात लोढा यांना पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास, सुरेश खाडे यांना कामगार, रविंद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अतुल सावे यांना सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण, गुलाबराब पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे यांना बंदरे व खनकर्म, संदिपान भुमरे यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्य सामंत यांना उद्योग, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा तर शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क ही खाती देण्यात आली आहेत.
Read also
- “सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
- “विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी
- “शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री
- “निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”