मुंबई : राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिला दिवस होता. विरोधी पक्षाकडून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 50 खोके एकदम ओके, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले गद्दार आले, ईडी सरकार हाय हाय, अशा घोषणा देत शिंदे-फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याआधी भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करीत सुचक इशाराही दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.
आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
एखादं ट्विट केलं तर त्यासाठी एवढा गदारोळ करण्याचं काहीच कारण नाही. कारण जेव्हा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून सोशल मीडियात अत्यंत विखारी टिका टिपण्या केल्या जातात. त्या वेळेला आम्ही काही बोलत नाही. प्रत्येकाला आपला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणुन मोहित कंभोज याचं ट्विट एवढं झोबण्याचं कारण नाही, असा टोला प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे.
“राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची निश्चितच मागणी विधान परिषदेत करणार आहे. या प्रकरणात कोणत्या व्यक्तीचा हात आहे हे पाहण्यापेक्षा त्या विषयाचंं गांभीर्य लक्षात घेऊन त्या विषयाकडे पाहण्याची गरज आहे. एखादा विषय प्रसार माध्यमातुन बाहेर आला असेल तर त्या विषयाला न्याय देणं हे लोकप्रतिनिधी म्हणुन प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयाला निश्चितच हात घालण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं प्रविण दरेकर म्हणाले.
महाराष्ट्राच्या दृष्टीने या अधिवेशनाकडे विश्वासाने महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनतेला सुख, समाधान देण्याचा प्रयत्न या शिंदे-फडणवीस सरकारने केला आहे. गेल्या अडीच वर्षात जे निरणय होऊ शकले नाहीत, सरकार म्हणुन यंत्रणा ठप्प होती. आज महारष्ट्रात गतिशिल सरकारचा असल्याचं महारष्ट्रातील जनतेला वाटत आहे. ग्रामीण भागतील किंवा शेतकऱ्यांचे महत्वाचे निर्णय या सरकारने घेतलेले आहेत, असंही प्रविण दरेकर म्हणाले.
Read also
- “50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
- “हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
- मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर