मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना 14 ऑगस्टला घडली होती. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातात विनायक मेटे याचं दुर्दैवी निधन झालं. यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना भाजपने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी केली आहे.
मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरक्षणासाठी सातत्यांनं आवाज उठवणारे आणि त्यासाठी निकरानं लढा देणारे नेते अशी मेटे यांची ओळख होती. विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला संधी मिळण्याची गरज आहे. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. त्यामुळ विनायक मेटे यांच्यानंतर किमान त्यांच्या पत्नीला तरी संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
विनायक मेटे यांच्या गाडीचा 14 ऑगस्टला पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं मात्र डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
Read also
- “शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री
- “निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”
- अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
- “50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
- “हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य