मुंबई : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची आजपासून चांगलीच कसोटी लागणार आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून सुरूवातीलाच विरोधी पक्षांनी विविध घोषणाबाजी देऊन परिसर दणाणून सोडलं. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख करीत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच शिंदे सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज विधानभवनाबाहेर तुफान घोषणाबाजी केली आहे. संजय शिरसाठ यांना मंत्रिपद न देणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात चांगलं खात न देणाऱ्या या सरकराचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना चुना लावणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, अश्या घोषणा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देत शिंदे सरकारला धारेवर धरलं. तसेच इडी सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा अशा देखील त्यांनी घोषणा दिल्या.
लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
आशिष शेलार यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, त्यांना मुंबईचे अध्यक्ष देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, त्यांना चुना लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, असं म्हणत धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षांनी जोरदार टोलेबाजी केली. विरोधकांची घोषणाबाजी सुरू असताना आशिष शेलार त्याठिकाणी आले. त्यांनी देखील वर हात करत आणि तोंडावर हसू आणत विधिमंडळात प्रवेश केला. तसेच आशिष शेलारांची ही प्रतिक्रिया पाहून विरोधी पक्षातील काही आमदारांच्या चेहऱ्यावर देखील हसू आले.
आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
विधानसभेमध्ये प्रवेश करीत असताना विरोधकांनी शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. बंडखोर आमदारांनी ज्यावेळी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आले रे आले गद्दार आले. 50 खोके एकदम ओके असं म्हणत त्यांना देखील डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही आमदारांसोबत आतमध्ये प्रवेश करीत होते. त्यावेळी देखील अशाच प्रकारच्या घोषणा सुरू होत्या.
Read also
- “निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”
- अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
- “50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
- “हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
- मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल