मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी काल इडीने मुंबईत मुलुंड, भांडूप व विक्रोळी या परिसरात छापे टाकले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दस्तावेज इडीने जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुलुंड येथील श्रद्धा बिल्डर कंपनीवर बुधवारी इडीने छापेमारी केल्याचे समजत आहे. या दरम्यान, कंपनीची कागदपत्रे तसेच संगणकाची देखील तपासणी इडीच्या अधिकाऱ्यांनी केली.
श्रद्धा बिल्डर यांचे बरेचसे बांधकाम हे विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात आहे. यातील बहुतांश बांधकाम हे संजय राऊत यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांच्या मतदरासंघातील आहे. यातील काही बांधकाम प्रकल्प पुर्ण झालेले आहेत तर काहींचे बांधकाम सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर इडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी वापरलेल्या तीन महागड्या गाड्या श्रद्धा डेव्हलपर्सच्या नावाने खरेदी केल्या होत्या. ईडीने काल तीन ठिकाणी छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. श्रद्धा डेव्हल्पमेंट व राऊत यांच्या आर्थिक व्यवहारांची इडीकडून चौकशी केली जात आहे.
“सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढच होत चालली आहे. तसेच त्यांची येत्या 22 ऑगस्टपर्यंत इडीने कोठडी देण्यात आली आहे. यातच आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार, तीन आमदार, माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवकांची फौज असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून सर्वात कमी म्हणजे फक्त 3200 शपथपत्रे गोळा झाली आहेत. शिवसेनेतील खासदार, आमदार, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदींना निष्ठा सिद्ध करण्यासाठी शपथपत्र सादर करण्याचे फर्मान काढण्यात आले. त्यानुसार शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये, शाखांमधून शपथपत्रे तयार करून मुंबईत पाठविण्यात येत आहेत.
“भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
दरम्यान, शिवसेनेने शपथपत्राचा मसुदा तयार केला असून तो नमूद केलेला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची नोटरी करावी लागत आहे. प्रत्येक निष्ठावंताला स्टॅम्प पेपरसाठी १०० रुपये आणि नोटरीसाठी ५० रुपये खर्च येत आहे. नोटरीसाठी पैसे खर्च होऊ नये यासाठी शिवसेना भवनामध्ये १२ व्यक्तींवर शपथपत्रांची नोटरी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read also
- “धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
- “शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
- “अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
- “शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”
- “एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”