पुणे : भोर तालुक्याच्या हिर्डोशी खोऱ्यातील विविध गावांमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. निगुडघर येथे झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे कॉंग्रेस पक्षात स्वागत केले.
सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे
तालुक्यातील निगुडघर, वडतुंबी, चिखलगाव, आंबवडे, म्हसर व इतर गावांमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रमुख कार्यकर्त्यामध्ये गणपत मांढरे, आप्पा सातपुते, अरविंद बांदल, रामचंद्र बांदल, शंकर भावेकर, सीताराम भावेकर, कांताराम भावेकर, विलास बांदल, आनंदा भिलारे, वसंत गायकवाड, नामदेव म्ह्सूरकर, संपतराव धोंडे, रामदास धोंडे, चंद्रकांत साळेकर, आप्पा बिंगरुट जगन्नाथ साळेकर आदींचा समावेश आहे.
गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, हिर्डोशी खोऱ्यातील प्रत्येक गावात काँग्रेसमार्फत विकासकामे केली असून यापुढील काळातही रस्ते, सिंचन योजना, शेतीपिकांचे झालेले नुकसान, कोंढरी व धानवली गावचे पुनर्वसन ही कामे मार्गी लावणार आहे. या विकासकामांच्या व सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस पक्ष नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वास आमदार थोपटे यांनी व्यक्त केला.
आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?
या कार्यक्रमास कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णाजी शिनगारे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहान बाठे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम थोपटे, पोपटराव सुके, विठ्ठल कुडले, आनंद आंबवले, अनिल सावले, सुभाषराव कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे, शिवाजीराव नांटबे, पांडुरंग धोंडे, लक्ष्मण पारठे आदींसह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Also :
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी; शिरूरमध्ये उडाली एकच खळबळ
- मुंबईत राजकीय भुकंप? भाजपचे १५ ते २० नगरसेवक डिंसेंबरमध्ये शिवसेनेते करणार प्रवेश
- शेवटच्या क्षणी काँग्रेस वगळता इतर पक्षांची युती होऊ शकते – गिरीष महाजन
- पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या दोन्ही आमदारांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मैदानात!
- तीन हजार रोख, मटण-मासे पार्टी, पत्ते खेळायला पैसै! शिवसेना आमदाराने उलगडलं निवडणुकीचं गणित