बीड : मराठा आरक्षणावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाड्या आडवल्या जात आहे. यातच बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा घरावर जोरदार दगडफेक करून गाड्या जाळून टाकल्या तर दुसरीकडे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…मराठा समाजाला आरक्षण मिळणार ? दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र होणार ? कोर्टात पार पडली मोठी सुनावणी
यातच आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काॅंग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातच आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यापालांकडे केली आहे. या अधिवेशनात आरक्षणाबाबतची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी सुरेश वरपुरकर यांनी विधानसभेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. हे त्यांना पटवून सांगितले. आरक्षणाच्या विविध प्रश्नांची तड लागण्यासाठी आमदारांनी विधानसभेत आपला आवाज बुलंद करावा असं काॅंग्रसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक आवाहन, घेतला ‘हा’ निर्णय
मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यातच आता भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला असून मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पहिला राजीनामा पडला आहे. लक्ष्मण पवार हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आमदार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. परंतु आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. या अधिवेशनात आरक्षणाबाबतची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी श्री सुरेश वरपूरकर यांनी विधानसभेत… pic.twitter.com/sqcvLnlAJ2
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदाराने दिला राजीनामा, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्याच आमदाराचा फोडलं ऑफिस
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम अन् दुसरीकडे शेतकऱ्याने घेतला ग’ळ’फा’स’
हेही वाचा…” राज्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर जाळलं, अन् देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये पक्षाचा प्रचार करताहेत
हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा? शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर
हेही वाचा…मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांनी दिला अजून एक इशारा, “आंदोलनाचा तिसरा टप्पा पेलणार नाही”