मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं. यामध्ये न्यामूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल उद्याच्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत स्विकारला जाईल. तसेच मराठा आरक्षणाबाबत एक समिती नेमली असल्याचंही शिंदेंनी घोषित केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची तुफान दगडफेक, सहा गाड्याही फोडल्या
मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, एम.जी. गायकवाड. संदीप शिंदे यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्ग आयोग आणि शासनाचा ही समिती मार्गदर्शन करणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे राज्य शासनासमोर चांगली संधी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी आपण स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठक तातडीने घेण्यात येऊन त्यामध्ये पुढील न्यायालयीन लढाई लढण्याविषयी निश्चित दिशा ठरविण्यात येईल. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह याचिकेवर न्यायालयीन कार्यवाही सुरु राहील. मात्र तो पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे करतील. त्याचप्रमाणे समाजाच्या मागासलेपणाचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट यासारख्या इतर नामांकित संस्थांकरवी नव्याने सर्व्हेक्षण करून इम्पेरिकल डेटा तयार करण्यात येईल. असंही एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता
दरम्यान, मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात मागील प्रक्रियेतील झालेल्या ज्या त्रृटी नोंदविल्या गेल्या आहेत त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना उर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचे स्कॅन तसेच भाषांतर करून घेण्यात येतील. त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदारांना उद्याच व्हिसीद्धारे सूचना देण्यात येऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रांची पडताळणी वेगाने करण्याच्या सूचना देण्यात येतील. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांनी दिला अजून एक इशारा, “आंदोलनाचा तिसरा टप्पा पेलणार नाही”
हेही वाचा…मराठा समाजाला आरक्षण मिळणार ? दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र होणार ? कोर्टात पार पडली मोठी सुनावणी
हेही वाचा…“कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक आवाहन, घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या, मराठा आंदोलक आक्रमक
हेही वाचा…अखेर प्रश्न सुटला..! मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?