हिंगोली : मराठा आरक्षणावरून राज्यात जोरदार आंदोलन पेटत असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाड्या आडवून मराठा समाजाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस तब्येत बिघडत असल्याने मराठा आरक्षण दिवसेंदिवस तापत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यातच हेमंत पाटील अन् मराठा आंदोलकांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेमंत पाटील आणि मराठा आंदोकांमध्ये राजीनाम्यावरून शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मी आता राजीनामा देतोय, सर्वांनी शांत बसायचं. राजीनाम्याच्या मागणीनंतर हेमंत पाटील यांचं चढ्या आवाजात उत्तर दिलं. त्यानंतर राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, या विषयांवर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. असं हेमंत पाटील यांनी लेटरहेडवर म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा पडला पहिला राजीनामा, पत्रात मांडल्या तीव्र भावना
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत उपोषण, आंदोलकांना पोलिसांकडून त्रास
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी