मुंबई : अजित पवार आमच्याबरोबर आले तेव्हा त्यांना हे स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल ते आम्ही दिलं आहे. अजित पवार हे परिपक्क राजकारणी आहेत. त्यांना राजकीय गणित समजतं असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
हेही वाचा…सरकार मायबाप तयार रहा…! ‘या’ मागण्यांसाठी लवकरच वंचितचा दणका मोर्चा नागपूरात धडकणार
सरकार निश्चितपणे स्थिर होतंच पण राजकारणात शक्ती वाढवावीच लागते. तुमची शक्ती वाढवण्यासाठी कुणी बरोबर येत असेल तर त्यांना का घेऊ नये? या पूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आमच्याकडे २०१९ ला येणार होता. स्थिर सरकार आणि काम करणारं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होऊ शकत नाही ते भाजपबरोबरच होऊ शकतं ही मानसिकता राष्ट्रवादीची होतीच. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सामील होण्याचं होतं. तसा प्रस्ताव दिला आणि आम्हाला योग्य वाटला अन् तो स्विकारला असं ही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“किती हा वेडेपणा, काहीतरी डोकं ठिकाणावर आहे का”, ‘त्या’ व्हिडीओबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची केस वाचली आहे. ते शंभर टक्के सांगतील की एकनाथ शिंदे अपात्र होणार नाही. अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. एकनाथ शिंदे यांना जरी अपात्र केलं तरी ते राज्याचे मुख्यमंत्री राहू शकतात. कारण ते विधान परिषदेवर आहेत. दुसरा काही प्लॅन नसून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि ते अपात्र होणार नाही. कारण कायद्याचा अभ्यास केला आहे. असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित
हेही वाचा…“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसात सुटणार ?” शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलं शुभ संकेत
हेही वाचा…‘तो’ लाडका कंत्राटदार कुणाचा ? काळ्या यादीत टाकणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल