मुंबई : ज्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची केस वाचली आहे. ते शंभर टक्के सांगतील की एकनाथ शिंदे अपात्र होणार नाही. अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. एकनाथ शिंदे यांना जरी अपात्र केलं तरी ते राज्याचे मुख्यमंत्री राहू शकतात. कारण ते विधान परिषदेवर आहेत. दुसरा काही प्लॅन नसून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि ते अपात्र होणार नाही. कारण कायद्याचा अभ्यास केला आहे. असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हेही वाचा…“किती हा वेडेपणा, काहीतरी डोकं ठिकाणावर आहे का”, ‘त्या’ व्हिडीओबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
यातच अजित पवार सत्तेत सामील झाले तेव्हा त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील आणि त्यांनी ते मान्य केलं आहे. अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता. तो आम्ही पूर्ण केला आहे. अजित पवार एक अनुभवी नेते आहेत. त्यांची मुख्यमंत्री इच्छा आहे. त्यांना वस्तुस्थिती समजते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा काही प्रश्नच नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“६ हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला, पण कामे तशीच”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
दरम्यान, राष्ट्रवादीच्या ४२ लोकांवर कुठली चौकशी आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे याचं सरकार किती नाकर्ते आहे. पुन्हा निवडणुकीत आम्ही निवडणूनच येणार नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
READ ALSO :
“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसात सुटणार ?” शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलं शुभ संकेत
हेही वाचा…‘तो’ लाडका कंत्राटदार कुणाचा ? काळ्या यादीत टाकणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हेही वाचा…सरकार मायबाप तयार रहा…! ‘या’ मागण्यांसाठी लवकरच वंचितचा दणका मोर्चा नागपूरात धडकणार