मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावरून दोन तासात हटवल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मी पुन्हा येईल, राष्ट्रनिर्मितीसाठी अशा आशायाचा फडणवीसांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. पंरतु काही काळानंतर तो लगेचच हटवला. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं
एखाद्याला यायचं असेल तर तो व्हिडीओ टाकून येणार का? किती हा वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. परंतु मी पुन्हा सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पुर्ण दिवस करतील. अन् ते मुख्यमंत्री असतांना त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एखादा व्हिडीओ असा पडला तसा पडला असं निरिक्षण नोंदवणं चुकीचं आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका
दरम्यान, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असा देवेंद्र फडणवीस व्हिडीओ भाजपच्या अधिकृत ट्विवटरवरून प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. राज्यात नेतृत्वबद्दल होऊन फडणवीस मुख्यमंत्री होणार अशई चर्चा सुरू असतांना तो व्हिडीओ हटवण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या चुकीने हा प्रकार घडला असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. यातच बेकायदेशीर मुख्यमंत्र्यापेक्षा आम्हाला घटनात्मक मुख्यमंत्री चालणार अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“६ हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला, पण कामे तशीच”, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना मोठा झटका, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घरवापसी, आज होणार पक्षप्रवेश
हेही वाचा…“एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली”, फडणवीसांचा तो व्हिडीओ अन् शिंदे गटाने दिलं उत्तर
हेही वाचा…“समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू”, मराठा आमदारांनी दिला सरकारला कडक इशारा
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर