मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ भाजपने सोशल मीडियावरून दोन तासात हटवल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मी पुन्हा येईल, राष्ट्रनिर्मितीसाठी अशा आशायाचा फडणवीसांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. पंरतु काही काळानंतर तो लगेचच हटवला. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. त्यावर आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल?” फडणवीसांना डिवचलं
एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली आहे. असं म्हणत राज्यातील सरकार कायदेशीर काम करीत आहे. संजय राऊतांनी वकिलांकडे ट्युशन लावावी. असं जोरदार प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी राऊतांना दिलं आहे. तसेच येत्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
दरम्यान, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असा देवेंद्र फडणवीस व्हिडीओ भाजपच्या अधिकृत ट्विवटरवरून प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. राज्यात नेतृत्वबद्दल होऊन फडणवीस मुख्यमंत्री होणार अशई चर्चा सुरू असतांना तो व्हिडीओ हटवण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या चुकीने हा प्रकार घडला असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. यातच बेकायदेशीर मुख्यमंत्र्यापेक्षा आम्हाला घटनात्मक मुख्यमंत्री चालणार अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून जावचं लागणार आहे. यातच अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झाले आहेत. कारण अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांचा नकार होता. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागणार आहे. कारण सर्वाच्च न्यायालयात जो निर्णय दिला आहे. तो काही काळानंतर मान्य करावाच लागणार आहे. अशा प्रकारे संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून देण्यात आल्याचं दाव्याने सांगतो, अस संजय राऊत म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू”, मराठा आमदारांनी दिला सरकारला कडक इशारा
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात, शिंदेंना मोदी- शाहांकडून संदेश,” बड्या नेत्याचा दावा