मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतरही शरद पवारांनी आगामी निवडणुकांसाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी साथ सोडली खरी, परंतु शरद पवारांनी आता राष्ट्रवादीच्या जुन्या जाणत्या नेत्यांना आपल्या गटात खेचण्यासाठी सुरूवात केली आहे. यासाठी त्यांच्या अलिकडेच भेटीगाठीही वाढल्या आहेत. यातच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले माजी आमदार पांडुरंग बरोरा आज सांयकाळी शरद पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद धोक्यात, शिंदेंना मोदी- शाहांकडून संदेश,” बड्या नेत्याचा दावा
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची घरवापसी झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. आज तीन वाजता शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आता राजकीय समीकरण बदललं आहे. पांडुरंग बरोरा यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी ते शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र सध्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झालं आहे. त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश करत असल्याचं म्हटलंय.
हेही वाचा…“पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल?” फडणवीसांना डिवचलं
शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी ४० वर्षापासून घनिष्ट संबंध आहेत परंतु आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत १० जुलै २०१९ ला प्रवेश करत असल्याचं बरोरा म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा २०१९ ला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेलो खऱ्या अर्थाने माझी चुक होती. परंतु आता आमच्या काकाने मला सल्ला दिला की शरद पवारांची भेट घेऊन लवकरच कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं पांडुरंग बरोरा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
दरम्यान, मागील काही दिवसापासून शरद पवारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांना पर्याय म्हणून प्रत्येक मतदारसंघात शरद पवार नव्या उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. यातच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शरद पवारांचं जंगी स्वागत केलं जात असून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. तर ठिकठिकाणी सभांचंही आयोजन केलं जात आहे. यातच आता माजी आमदारांना शरद पवार आपल्या गटात घेतांना दिसत आहेत.
कोण आहेत पांडुरंग बरोरा
पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीचे वाडा-शहापुरचे माजी आमदार आहेत
मोदी लाटेतही २०१४ साली राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.
बरोरा यांचे 40 वर्षांपासून राष्ट्रवादीशी आणि शरद पवार, अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.
२० वर्षात जेवढा निधी आघाडीने दिला नाही, तेवढा ५ वर्षात युती सरकार देणार असं म्हटले होते.
शहापूर तालुका टंचाईमुक्त आणि विधानसभा भगवा युक्त करण्याचा प्रण घेतला होता.
तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता.
परंतु जुलै २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
त्यावेळी आषाढी एकदशीच्या मुहुर्तावर राष्ट्रवादीच्या पांडुरंगाच्या हातात भगवी पताका असे मॅसेज व्हायरल झाले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली”, फडणवीसांचा तो व्हिडीओ अन् शिंदे गटाने दिलं उत्तर
हेही वाचा…“समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू”, मराठा आमदारांनी दिला सरकारला कडक इशारा
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी काय केलं ? थेट आकडेवारीच जाहीर करत शरद पवारांनी मोदींना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…“अजित पवारांना दु: ख झालं का ? ते समाजापेक्षा मोठे नाहीत”, जरांगे पाटलांनी अजित पवारांना फटकारलं
हेही वाचा…बालेकिल्ल्यात अजित पवारांची नाचक्की, मराठा समाजाने दिला मोठा दणका