हिंगोली : मराठा आरक्षणावरून राज्यात जोरदार आंदोलन पेटत असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाड्या आडवून मराठा समाजाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस तब्येत बिघडत असल्याने मराठा आरक्षण दिवसेंदिवस तापत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, या विषयांवर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठिंबा असून आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. असं हेमंत पाटील यांनी लेटरहेडवर म्हटलं आहे.
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
खासदार हेमंत पाटील कडवे शिवसैनिक असून त्यांनी नांदेड येथून राजकारणाला सुरूवात केली. नांदेड हे त्यांचे कार्यक्षेत्र असून तिथून ते नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, शिवसेना जिल्ह्याप्रमुख म्हणून काम केले आहे. संधी मिळाल्यानंतर ते शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार झाले. सुरूवातीच्या काळात हेमंत पाटील हे राज ठाकरे यांच्या जवळचे होते. पण आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुढे संधी मिळेल हे हेरून त्यांनी सेनेत राहणे पसंत केले.
READ ALSO :
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत उपोषण, आंदोलकांना पोलिसांकडून त्रास
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित