बीड : गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मराठा समाजाकडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन दिवसापुर्वी आंदोलकांनी तहसिलदाराची गाडी पेटवून दिली होती. तर महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस देखील आंदोलकांकडून पेटवून देण्यात आल्या आहेत. यातच मराठा आरक्षणावर काहीही बोलत नसल्याने मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे.
हेही वाचा…बंजारा समाजाचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला, पक्षाने दिली लगेचच मोठी जबाबदारी
मराठा आरक्षणावर काहीही बोलत नसल्याने मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेर आंदोलनांचा पवित्रा हाती घेतला. त्यानंतर २०० ते ३०० जमावाने प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. यातच पार्कींगमध्ये असलेल्या सर्व गाड्या देखील मराठा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच ते सहा गाड्या फोडल्या गेल्या आहेत.
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
दरम्यान, प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. परंतु आंदोलकांनी तीव्र आक्रमक केल्याने पोलिसांना देखील काही करता आलं नाही. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलचं पेटलं गेलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
हेही वाचा…“मराठा समाजाने षडयंत्र ओळखावे” असीम सरोदे यांनी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा पडला पहिला राजीनामा, पत्रात मांडल्या तीव्र भावना
हेही वाचा…“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीत उपोषण, आंदोलकांना पोलिसांकडून त्रास