पुणे : मराठा आंदोलकांकडून मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. परंतु आता थेट मराठा आंदोलक नेत्यांची घरं टार्गेट करीत आहेत. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यानंतर त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीडमधील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे. या घटनेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…अखेर प्रश्न सुटला..! मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय ?
बीडमध्ये एका आमदाराचे घर काही अज्ञात व्यक्तींनी जाळले आहे. लोकप्रतिनिधींची घरे पेटवून दिली जात आहेत, अशा वेळी राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्णत: ढासळली आहे. हे गृहमंत्री आणि ट्रिपल इंजिन खोके सरकारचे पुर्णपणे अपयश आहे. गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीय.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची तुफान दगडफेक, सहा गाड्याही फोडल्या
राज्यात मराठा आंदोलनाचा तीव्र पडसाद आता संपुर्ण राज्यात दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. शहराच्या मोठ्या रस्त्यावर रास्तो रोको आंदोलन करतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस भाजपचा प्रचार करण्यासाठी छत्तीसगड राज्यात गेले आहेत.
हेही वाचा…“राजीनामा देऊन तुम्ही उपकार करता का ?” हेमंत पाटील आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक
दरम्यान, मराठा आरक्षणावर काहीही बोलत नसल्याने मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेर आंदोलनांचा पवित्रा हाती घेतला. त्यानंतर २०० ते ३०० जमावाने प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. यातच पार्कींगमध्ये असलेल्या सर्व गाड्या देखील मराठा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या आहेत. यामध्ये पाच ते सहा गाड्या फोडल्या गेल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा? शिंदे समितीचा पहिला अहवाल सादर
हेही वाचा…मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटलांनी दिला अजून एक इशारा, “आंदोलनाचा तिसरा टप्पा पेलणार नाही”
हेही वाचा…मराठा समाजाला आरक्षण मिळणार ? दुसरीकडे एकनाथ शिंदे अपात्र होणार ? कोर्टात पार पडली मोठी सुनावणी
हेही वाचा…“कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भावनिक आवाहन, घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरावर आधी तुफान दगडफेक, मग थेट गाड्याच जाळल्या, मराठा आंदोलक आक्रमक