मुंबई : वंचितला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे होती. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती केल्याने महाविकास आघाडी च्या नेत्यांमध्ये नाराजी होती. परंतु अजित पवार शिंदे-फडणवीस सोबत गेल्याने महाविकास आघाडी आता वंचित सारख्या समविचारी पक्षांशी मोट बांधणे गरजेचे वाटू लागले आहे. असं विधान काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, महायुतीत आणखी एक भिडू सहभागी होणार का?
तसेच काॅंग्रेस फुटणार हे बिनबुडाचं आहे. त्यात काहीही तथ्य नाही. अफवा आहे. याचबरोबर पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत, त्यांचे आम्ही काॅंग्रेसमध्ये स्वागत करू. त्या आल्यावर आम्हाला फायदा होईल. त्या लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांना समाजाचा पाठिंबा आहे. मराठवाड्यात स्वागत करू, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा…नीलम गोऱ्हेंचं शिंदे गटात प्रवेश, ‘भावी आरोग्यमंत्री’ म्हणून सुषमा अंधारेंनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता. मी यापुर्वी विरोधी पक्ष नेता राहिलो आहे. पुन्हा जबाबदारी मिळाली तर आनंद होईल, याबाबत हायकमांड निर्णय घेणार. न घाबरणारा, न झोपणारा दबावात न येणारा नेता पाहून हायकमांड निर्णय घेणार आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये वाद होण्याची सुरूवात झाली आहे. आता विधानसभेच्या ४०० जागा कराव्या लागणार आहेत. अन लोकसभेच्या १०० करून टाका हे सर्व हास्यास्पद सुरू आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काॅंग्रेस अलर्ट मोडवर, सगळ्या काॅंग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलवलं
हेही वाचा…“जयंत पाटलांवर अपात्रतेची कारवाई करणार नाही,” अजित पवार गटाचा मोठा निर्णय
हेही वाचा…२१ वर्ष, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही..! शिंदे गटात गेल्याने निलम गोऱ्हेंना आदित्य ठाकरेंचा टोला
हेही वाचा…हिंदुत्व, लव्ह जिहादवरून भाजपच्या नेत्यांना रडवलं, अजित पवार गटाकडून ‘या’ आमदाराची प्रतोद म्हणून निवड
हेही वाचा…अत्यंत जवळचा विश्वासू, माजी मंत्री आमदार शरद पवारांची साथ सोडणार