मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देण्यात आली. भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांची खाती काढून दिल्याने आता पालकमंत्री पद देखील काढून घेण्यात येणार आहेत. यातच शिंदे गटातील मंत्री दादा भूसे यांच्याकडील खनिकर्म खातं काढून त्यांच्याकडे आता सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद देण्यात आलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती मिळाली, वाचा शिंदेंच्या मंत्रिमंडळातील संपुर्ण मंत्र्यांची यादी
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या मंत्र्यांना धक्के बसले असताना दादा भुसेंना थेट सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळालं आहे. त्याआधी त्यांच्याकडे बंदरं आणि खनीकर्म मंत्रालय होतं. आता मात्र त्यांना मोठी लॉटरी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असणारं सार्वजनिक बांधकाम खातं मिळाल्यानं दादा भुसेंची पॉवर वाढली आहे. शिंदेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात महत्त्वाची कामं केली. मोठमोठे रस्ते, महामार्ग बांधले. आता हेच खातं त्यांनी भुसेंकडे दिलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांनी डाव साधला, शिंदेंच्या आमदारांची पंचाईत, शिंदे गटातील आमदार तोंडावर पडले
सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मिळवणाऱ्या दादा भुसेंकडील पालकमंत्री काढून घेतलं जाण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या येवल्यातून निवडून येणाऱ्या छगन भुजबळ यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. सध्या नाशिकचं पालकमंत्रीपद दादा भुसेंकडे आहे दादा भुसे हे भुजबळांना राजकारणात बरेच ज्युनियर आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपद भुजबळांकडे जाऊ शकतं. त्यामुळेच भुसेंना मंत्रिमंडळात चांगलं खातं दिलं गेल्याची चर्चा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये हमरीतुमरी, नितेश राणे-अमोल मिटकरी एकमेकांत भिडले
हेही वाचा…“शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर शिंदे गटाला येऊन थांबावं लागलं”, खातेवाटपावरून काॅंग्रेसने डिवचलं
हेही वाचा…अब्दुल सत्तार यांच्या हातून कृषीमंत्रीपद निसटलं, राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता बनला महाराष्ट्राचा नवा कृषीमंत्री
हेही वाचा…अजित पवारांना अर्थ खातं, शिंदे गटाच्या आमदारांना खाली माना घालून फिरावं लागणार
हेही वाचा…दबक्या पावलांनी आले अन्..! शिंदेंचे मंत्री बघत राहिले अन् अजित दादांनी मैदान मारलं