नांदेड : काँग्रेसच्या वतीने उद्या (मंगळवार) नांदेडमध्ये चार जिल्ह्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्य प्रभारींसह अर्धाडझन मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. त्याचाच भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. देगलूर विधानसभेच्या तयारीला काँग्रेस पक्ष लागला असून निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीला नांदेड, हिंगोली परभणी आणि लातूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्याना आमंत्रित करण्यात आलं आहे.
भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील
मंगळवारी दुपारी १ वाजता मालेगाव रस्त्यावरील भक्ती लॉन्स येथे नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील भव्य डिजीटल बॅनर सर्वांचे आकर्षण ठरत आहे. भक्ती लॉन्स येथील चार जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत ठेवण्यात आलेल्या आढावा बैठकीस केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
Read Also :
- नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आणि त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं – शिवसेना
- म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
- शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…
- आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
- “उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप